भडगांव : जादूटोणाचा संशय अन धारदार शस्त्राने सपासप…
रिपोटर चेतन सरोदे /प्रभाकर सरोदे
भडगांव शहरातील पेठ भागातील सुपडु नाना पाटील यांचा खुन भडगांव शहरातीलच पेठ भागातील एका इसमाने उधारीचे पैसे मागण्याच्या कारणावरून व जादूटोणा केल्याच्या संशयावरून धारधार शास्त्राने केला असल्याचा धक्कादायक प्रकार आज दिनांक 8 मे बुधवार रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आला असल्याची माहिती सायंकाळी 6 वाजता भडगाव पोलिसांतर्फे देण्यात आली आहे. दिनांक 7 मे 2024 रोजी सायकांळी 7:30 ते दिनांक 8 मे 2024 रोजी सकाळी 7:45 वाजेच्या पुर्वी भडगांव शहरातील पेठ भागातील कुणाल नामक युवकाने सुपडू पाटील यांनी दिलेले पैसे परत मागण्याचे कारणावरून व काहीतरी जादुटोणा केल्याचे संशयावरुन सुपडु नाना पाटील वय ७८ वर्ष यांचा वरखेड तालुका भडगाव गावाच्या जवळ असलेल्या खदानीत धार धार शस्त्राने वार करुन खुन केला असल्याची फिर्याद मयताचा मुलगा ज्ञानेश्वर पाटील याने दिल्यावरून भडगाव पोलिसात संशयित आरोपी विरुद्ध कलम 302, 201 अंतर्गत खुणाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून या घटनेचा पुढील तपास भडगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहेत.