पाचोरा ! महाविकास आघाडीला धक्का?
सत्यर्थ न्यूस रिपोटर चेतन सरोदे/प्रभाकर सरोदे
लोकसभा प्रचारासाठी पाचोरा शहरात आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ आणि संजय वाघ यांच्याशी बंद द्वार गुप्त गु झाले असून या चर्चेनंतर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा तातडीने सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त होत आहे. माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी झालेल्या गुप्त बैठकीला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार मंगेश दादा चव्हाण महायुतीच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत ही विशेष बैठक पार पडली. यात मुरब्बी राजकारणी व महाविकास आघाडीचे पाचोरा भडगाव मतदार संघातून नेतृत्व करत असलेले संजय नाना वाघ यांना महायुतीत सक्रिय होण्यासाठी गळ घालण्यात आला असून त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या भेटीनंतर पाचोरा तालुका व जळगाव लोकसभा मतदारसंघात चर्चेला उधाण आले असून, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसेल अशी चर्चेला उधाण आले आहे. तर याबाबत संजय नाना वाघ यांचेकडून अधिकची अधिकृत माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता ते नॉट रिचेबल मिळून आले