रिपोटर चेतन सरोदे/प्रभाकर सरोदे
इन्स्टाग्रामवर ओळखीतून विधवेशी घरोबा अन अत्याचार..
औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी २३ वर्षीय विधवेसोबत इन्स्टाग्रामवर ओळखी करून लग्नाचे वचन देत स्वतंत्र खोली करून घरोबा केला. मात्र, लग्न न करता ऐनवेळी पळ काढणाऱ्या तरुणावर बुधवारी (ता. १) अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. २३ वर्षीय महिला कुटुंबासह वास्तव्याला आहे. ८ मार्च २०२३ ला महिलेची ओळख विकास याच्याशी झाली. विकासने महिलेचा ओळखीचा गैरफायदा घेत जवळीक साधली. त्यानंतर तिला लग्नाने आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरवात केली. हा प्रकार सहन न झाल्याने अखेर पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात विकास याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दयानंद सरवदे तपास करीत आहेत. इन्स्टाग्रामवर मैत्री•• महिलेच्या पतीचे २०२२ मध्ये निधन झाले. सोशल मीडियावर दोन मुलांची आई असलेल्या विधवेची विकास याच्याशी झाली. ओळखीतून भेटीगाठी झाल्या. विकासने विधवेस लग्नाचे वचन देत दोन्ही मुलांची जबाबदारी घेण्याचे कबूल केले. स्वतंत्र रूम करून दोघेही सोबत राहू लागले. तिने लग्नासाठी विचारणा केल्यावर विकासने पळ काढला. संशयित अटकेत•• गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक दयानंद सरवदे, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राजेंद्र उगले, प्रदीप पाटील, विशाल कोळी, ललित नारखेडे यांनी विकास याला ताब्यात घेतले. त्याला गुरुवारी (ता. २) जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पोलिस कोठडीत त्याची रवानगी केली

















Leave a Reply