भडगाव पोलीस स्टेशन हद्दीत निघाला रूटमार्च.
रिपोटर : चेतन सरोदे / प्रभाकर सरोदे
रोजी सायंकाळी 6 वाजता आगामी लोकसभा 2024 चे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भडगाव पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्च चे आयोजन करण्यात आलेले होते. रूट मार्च भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस ठाण्याचे 3 अधिकारी, 20 अंमलदार, तसेच राज्य राखीव पोलीस दल, केरळ यांचे 2 अधिकारी , 50 पोलीस अंमलदार असे काढण्यात आला होता. रूट मार्चमध्ये मेन रोड, सराफगल्ली, जलाली मोहल्ला, आझाद चौक, मेढ्या मारोती, मर्कस मशिद, कारगिल चौक, टोणगाव, समर्पण हाँस्पीटल, उज्वल काँलनी, बाळद रोड, समर्थ डेअरी, चाळीसगाव चौफुली, बस स्टँड, पाचोरा चौफुली हा परिसर समाविष्ट करण्यात आलेला होता