Advertisement

लखनऊ : लग्नाचं एक विचित्र

http://satyarath.com/

लखनऊ : लग्नाचं एक विचित्र

रिपोटर चेतन सरोदे/प्रभाकर झोपेत

समोर आलं आहे. ज्यात नवरदेवाला आपली एक चूक इतकी महागात पडली की नवरीने लग्नच मोडलं. उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंडमधील महोबा येथे ही घटना घडली. लग्नसमारंभात वरमाळेनंतर सात फेरे सुरू असतानाच मद्यधुंद वराने वधूच्या आत्यासोबत फ्लर्टिंग करण्यास सुरूवात केल्याने लग्नात खळबळ उडाली. मद्यधुंद वराच्या कृत्यामुळे त्रासलेल्या नवविवाहित वधूने लग्नासच नकार दिला. एवढंच नाही तर वधूकडील लोकांनी पोलिसांकडे तक्रार करून नवरदेवावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
श्रीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या हल्के अहिरवार यांची मुलगी करीनाचा विवाह मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील पानपुरा गावात सुनील कुमार यांचा मुलगा दीपक याच्यासोबत निश्चित झाला होता. 25 एप्रिल रोजी दीपक लग्नाच्या वरातीसह गावात पोहोचला. जिथे वरमाळेसोबत लग्नाचे इतर विधी सुरू होते. त्यानंतर वराच्या एका कृत्याने लग्नसमारंभात व्यत्यय आणला.

मंडपात सात फेरे सुरू होते. तेव्हाच वराने वधूच्या आत्यासोबत फ्लर्टिंग सुरू केलं. मग काय, हे पाहून नवरी संतापली. तिने लगेचच नवरदेवाशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. वधूच्या नाराजीनंतर विवाह सोहळ्यातील सर्व विधी थांबवण्यात आले. हे प्रकरण स्थानिक पोलीस ठाण्यात पोहोचलं. पोलीस प्रशासनाने समजावण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र, नवरी या वराशी लग्न करण्यास स्पष्ट नकार देत आहे. नवरदेवाचे कुटुंबीय मात्र त्याच तरुणीसोबत आपल्या मुलाचं लग्न लावण्यावर ठाम आहेत.

https://satyarath.com/

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!