सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे ह्यांच्या प्रचारार्थ इंडिया- महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली.
सोलापुरातील कर्णिक नगर मैदानात पार पडलेल्या ह्या सभेत महाविकास आघाडीची एकजूट दिसली. ही एकजूट होती हुकूमशाही उलथविण्यासाठी, संविधान रक्षणासाठी!
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना, ‘आम्हाला आमच्या देशात एकाधिकारशाही मान्य नाही, आम्ही हुकूमशाही येऊ देणार नाही’; ह्या निर्धाराचा पुनरुच्चार केला.
सभेला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर तसेच इंडिया-महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी, निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.

















Leave a Reply