Advertisement

महाराष्ट्र-अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीची रक्कम मिळणार

http://satyarath.com/

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीची रक्कम मिळणार

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेला यश. जिल्हा परिषदेचे अपील फेटाळत ग्रॅच्युईटीची रक्कम देण्याचा औद्यगिक न्यायालयाने दिला आदेश. न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या तसेच मृत्यू पावलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना मा.सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्यूईटीची रक्कम मिळावी.म्हणून सुमारे १२२ अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल करत मागणी केली होती. मा.कामगार न्यायालयाने सेवानिवृत्त(रिटायर्ड)झालेल्या, राजीनामा दिलेल्या अंगणवाडी कर्मचारी आणि मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसांना मा.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युईटीची रक्कम अदा करावी. असा आदेश दि.३० जानेवारी २०२३ रोजी राज्य शासनासह धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेला दिला होता. परंतु राज्य शासन आणि जिल्हा परिषदेने मा.कामगार न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता मा. औद्योगिक न्यायालयात अपील दाखल केले होते. सदर अपील प्रकरणी मा. कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त(रिटायर्ड) झालेल्या,राजीनामा दिलेल्या आणि मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटीची एकूण रक्कम आधी कोर्टात जमा करा त्यानंतरच अपील प्रकरणी कामकाज चालविण्यात येईल.असे म्हणत मा.औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश श्री.दिपक एल.भागवत यांनी अपिल फेटाळून लावले आहे. त्यामुळे न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी दिली. सदर प्रकरणी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.श्री.बी.एस.पाटील यांनी कामकाज पाहिले.संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाने आणि रामकृष्ण बी.पाटील यांनी त्यांना कामकाजात सहकार्य केले. संघटनेने केलेल्या प्रयत्नाला यश आहे आहे म्हणून अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे.असे आवाहन संघटनेने केले आहे.

https://satyarath.com/

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!