पाचोरा : धक्कादायक! तो चाकू घेऊन गावात
लोखंडी धारधार व अनकुचीदार चाकु बाळगुन पाचोरा तालुक्यातील वडगांव टेक गांवी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने चाकू बाळगणाऱ्याविरुद्ध पाचोरा पोलिसांत दिनांक 27 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक 29 एप्रिल सोमवार रोजी दुपारी 12 वाजता पाचोरा पोलिसांतर्फे देण्यात आली आहे. दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी 7:30 वाजताचे सुमारास महिपाल नामक ईसम वय ३५ वर्षे राहणार वडगांव टेक गांवी त्याचे कब्जात ४०० रुपये किंमतीचा एक लोखंडी धारधार व अनकुचीदार चाकु बाळगुन वडगांव टेक गांवी दहशत निर्माण करण्याचे बेतात असतांना पाचोरा पोलिसांना मिळुन आला आहे. म्हणून त्याचेविरुध्द भारतीय शस्त्र अधिनियम ४२५ प्रमाणे पाचोरा पोलीस स्टेशन येथे पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंपी यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे मार्गदर्शनाखाली श्यामकांत पाटील हे करीत असून सदर कारवाई डी. बी. पथकाने केली आहे.

















Leave a Reply