भडगाव : घुटक्यातील संशयीतास जमीन मंजूर
रिपोटर: चेतन सरोदे/प्रभाकर सरोदे
* भडगांव तालुक्यातील अंजनविहिरे फाट्याजवळ दि. 27 मार्च रोजी इको कंपनीची गाडीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला, मानवी आरोग्यास घातक व अपाय कारक अलेला सुगंधी विमल कंपनीच्या गुटखा असा एकूण 1,53,990/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने संशयित वाहन चालक अशोक तोतला विरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली होती. यातील संशयीत आरोपीतास जामीन मंजूर झाल्याची माहिती आज दिनांक 28 एप्रिल रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता संशयीत आरोपीच्या वकिला तर्फे देण्यात आली आहे. आज दिनांक 28 एप्रिल रोजी तपास अधिकारी हिरालाल पाटील यांनी सदर संशयित आरोपीस न्यायालयात हजर करून पाच दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यावर संशयित आरोपी तर्फे ॲड. निलेश जवाहरलाल तिवारी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. युक्तिवादामध्ये त्यांनी “दाखल करण्यात आलेला गुन्हा व त्याखाली लावण्यात आलेले कलम हे चुकीचे असून पोलिसांना सदर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे व कार्यवाही करण्याचे अधिकार नाही, तसेच अटक देखील करण्याचे अधिकार नाही व पोलीस कस्टडी मागण्याचा देखील अधिकार नाही” असा युक्तिवाद करून उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील न्यायनिर्णयाचा दाखला देऊन केस लॉ व विशेष पोलिस महानिरीक्षक व अप्पर पोलीस महासंचालक यांनी पोलीस विभागास कलम 328 प्रमाणे गुन्हा दाखल न करण्याचे दिलेले आदेशाबाबतचे पत्र देखील दाखल केले. त्यामुळे ॲड. निलेश तिवारी यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून व दिलेले केस लॉ व पत्र ग्राह्य धरून न्यायालयाने तपास अधिकारी यांचा पोलीस कस्टडी रिमांड मागणीचा अर्ज नामंजूर करण्याबाबत आदेश पारित करून संशयीतास न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर संशयीता तर्फे ॲड. निलेश जवाहरलाल तिवारी यांनी जामीन मिळणेकामी अर्ज दाखल केला व सदर जामीन अर्जाचेकामी ॲड. तिवारी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. सदर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने संशयितास जामिनीवर मुक्त करण्याचा आदेश पारित केला व संशयिताची जामीनावर मुक्तता केली.

















Leave a Reply