Advertisement

जनसुराज्य पक्षाचे चे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा;अनेक राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी दिल्या शुभेच्छा


आज मिरज नगरीचे सुपुत्र आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितजी कदम यांचा वाढदिवस .. आजचा दिवस म्हणजे मिरज पासून मुंबई पर्यंत सर्वांच्या अगदी मोबाईल वर स्टेटस हा समित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा हा पाहिजेच. कामाचा माणूस … मिरज नगरीचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम यांचे चिरंजीव असूनही कोणताही मोठेपणा मिरवणे नाही, कि कोणताही डामडोल नाही जनमानसातील एक उभरते नेतृत्व म्हणून आज समित कदम यांच्याकडे पाहिले जाते. जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि वारणा उद्योग समुहाचे कुटुंब प्रमुख आदरणीय आमदार डॉ विनयजी कोरे यांनी अत्यंत विश्वासाने समितजी यांच्या खांद्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची मोती जबाबदारी सोपवली आणि आज त्यांनी ती जबाबदारी सार्थ करत पक्षाची ताकद वाढवत असताना युवा वर्गाला सामावून घेतले आहे एक चांगले संघटन उभे केले आहे. युवा वर्ग आज त्यांच्याकडे मोठ्या आशेने आकर्षित होतोय. कित्तेक बेरोजगार हातांना समित नी रोजगाराचा हात देऊ केलाय. आज विविध राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरावरील पातळ्यांवर अनेक मंत्री गण समित यांच्या मनमोकळ्या आणि लोभस स्वभावामुळे जवळीक वाढवून आहेत. आज खुद्द भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्याशी ते ‘कनेक्ट’ असतात तर मुख्यमंत्री देवेन्द्रजी यांच्याबरोबर त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. जन्मताच समित यांना त्यांचे वडील बाळासाहेब यांच्याकडून जनसेवेचे बाळकडू मिळाले आहे. मिरजेतील विविध भागातील अनेक नागरिकांची वर्दळ त्यांच्या निवासस्थानी नेहमी पहायला मिळते. मिरजेच्या कानाकोपऱ्यातून अगदी ग्रामीण भागातील नागरिक त्यांच्याकडे अनेक प्रश्न घेऊन येत असतात त्या प्रमाणे अगदी शिपायापासून ते मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी समित यांचा फोन तासंतास सुरु असतोच. आज समित यांचा वाढदिवस या निमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराने शुभेच्छांचे डिजिटल बॅनर अगदी मुंबई पर्यंत ठिकठिकाणी ऊभे केले आहेत सालाबाद प्रमाणे २३ जून हि तारीख मिरज शहर आणि पंचक्रोशी बरोबरच सांगली जिल्ह्यातील नगरिकांच्या मनामनात कायम उत्साहाने साजरी होत असते. आज समित कदम यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अगदी अल्प काळात घेतलेली भरारी हि खरंच कौतुकास्पद आहे आज ते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत त्याच बरोबर पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीचे समन्वयक आहेत. मिरजकर नागरिक म्हणून आता मिरजेतील हा तरुण चेहरा आमदार व्हावा अशी सर्वसामान्य नागरिकांची इच्छा का असू नये बरं? लवकरच आजच्या या त्यांच्या वाढदिनी ते आमदार व्हावेत अशी प्रार्थना श्री गणेश चरणी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!