Advertisement

“तो स्वप्नात आला त्याने दृष्टांत दिला अन् खाणीतून प्रकटली बाप्पाची ६ फुटी मूर्ती ..”

प्रतिनिधी सुधीर गोखले

आज संकष्ट चतुर्थी त्यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ला तालुक्यातील ‘रेडी येथील श्री द्विभुज गणपती बद्दल जाणून घेऊया कोकणातल्या या जागृत देवस्थानाचा इतिहास आणि महिमा खूपच अद्भूत आहे. १८ एप्रिल १९७६ रोजी एका स्थानिक गणेश भक्ताला स्वप्नात दृष्टांत झाला आणि खाणीत खोदकाम करताना जमिनीखाली तब्बल ६ फूट खोलीवर बाप्पाची ही अत्यंत देखणी आणि भव्य मूर्ती सापडली. या बाप्पाला फक्त दोन हात आहेत आपल्या सर्वाना माहितीच आहे कि आपल्या सर्वांच्या आवडत्या बाप्पाला सामान्यतः चतुर्भुज म्हणजेच चार हात असतात प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे किंवा मोदक धारण केलेला असतो, पण रेडीच्या या बाप्पा ला ‘द्विभुज’ (दोन हात असलेला) म्हणतात. ही मूर्ती एकाच अखंड दगडात कोरलेली असून तिची उंची ६ फूट २ इंच आहे. बाप्पाच्या एका हातात मोदक असून दुसरा हात भक्तांना आशीर्वाद देणारा आहे. बाप्पाचे आवडते वाहन असलेले आपले मूषकराज मूर्ती सापडल्यानंतर बरोबर दोन महिन्यांनी त्याच परिसरात आढळून आले तेही पाषाणात कोरले गेले आहेत. या मंदिर आवारामध्ये एकंदरीतच रेडी या अतिशय निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या गावामध्ये आणि मंदिर परिसरामध्ये, माड-पोफळीच्या बागा, जवळच शांत समुद्रकिनारा आणि बाप्पाच्या दर्शनानं मिळणारी मनःशांती लाभते. दर संकष्टी विशेष करून अंगारकी ला राज्यातील गणेश भक्तांची या मंदिरामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी रांग असते. एकवेळ अवश्य पहावा असा या मंदिराचा आणि रेडीच्या या श्री गणेशाचा थाट काही वेगळाच आहे

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!