महाराष्ट्राची भाग्यरेषा अशी बिरुदावली लाभलेल्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पायथा विद्युत गृहाने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे या विद्युत गुहाने आपला स्वतः चा विक्रम जो २०१८-२०१९ साली निर्माण केला होता १९४.२४९ दशलक्ष युनिट विद्युत निर्मितीचा तो मोडीत काढत नव्याने विक्रम प्रस्थापित केला आहे. कोयना धरणाच्या पायथ्याशी असलेल्या विद्युत गृहाने यंदा म्हणजे १ जून ते ३१ मे अखेरीस संपलेल्या जल वर्षांमध्ये ४८.६२ टी एम सी पाण्याचा वापर करत २१९.८२४ दशलक्ष युनिट्स वीज उत्पादन करून नवीन विक्रम निर्माण केला आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत च्या अगदी या धरणाच्या स्थापने पासूनचा हा वीज निर्मिती मधील सर्वोच्य वीजनिर्मितीचा उच्चांक समजला गेला आहे. जलसंपदा विभाग आणि महाजनको मधील समन्वयाने उपलब्ध जलसाठ्याचा काटेकोर वापर तांत्रिक अचूकता आणि नियोजन बद्ध कार्यपद्धती यामुळे हे शक्य झाले आहे. १०५ टी एम सी एव्हडी पाण्याची साठवण क्षमता असलेले कोयना धारण हे पश्चिम महाराष्ट्रासाठी एक वरदान ठरले आहे सिंचन योजना आणि वीजनिर्मिती साठी या कोयना धारण हे महाराष्ट्राची भाग्यरेषा समजली जाते. धरणाच्या पायथा वीज गृहातून नियोजन बद्ध सुमारे २२०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्याची क्षमता आहे. या पाण्याच्या विसर्गासाठी नियंत्रित पद्धतीने विसर्ग केला जातो. या नव्या विक्रमाच्या मागे कोयना धारण व्यवस्थापन कोयना सिंचन आणि पायथा विद्युतगृहातील असंख्य ज्ञात अज्ञात अभियंते अधिकारी आणि या प्रकल्पासाठी झटलेले तांत्रिक कर्मचारी यांचे नियोजन बद्ध कार्य सात्यत्यपूर्ण देखभाल आणि समन्वय मोलाचे ठरले आहे. साधारणपणे १६ मी १९६० रोजी सुरु झालेला कोयना धरणाचा हा पहिला टप्पा आज राज्याच्या ऊर्जा निर्मितीचा कणा मानला जातोय. देशाचे प्रधानमंत्री स्व.जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृती आजही या धरणाच्या निमित्ताने जपल्या गेल्या आहेत. तसेच नव्या महाराष्ट्राचे शिल्पकार स्व यशवंतरावजी चव्हाण यांची दूरदृष्टी या धरणाच्या माध्यमातून आजही जनता अनुभवत आहे.
Leave a Reply