आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. सांगली जिल्ह्यासह सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका आणि सांगली गणपती पंचायतन संस्थानचे युवराज आदित्यराजे विजयसिंहराजे पटवर्धन यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींनी आदरांजली वाहिली. महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अत्यंत उत्साहात, पारंपरिक वातावरणात आणि मोठ्या अभिमानाने साजरी करण्यात आली. शिंदे मळा परिसरात असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या चौकातील अश्वारूढ पुतळ्यास तसेच महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त दालनात मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या जयंतीचे औचित्य साधून रघुवंश सोसायटी (शाहूनगर, सांगली) येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या प्रांगणात भव्य प्रतिमा पूजन व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अभयनगर येथील श्री साई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या प्रमुख उपस्थितीत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना ३६५ दिवस अविरत अभिवादन करण्याचा संकल्प’ पूर्णत्व सोहळा यावेळी अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. लोकसहभागातून राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. उत्सव समितीचे अध्यक्ष तथा मनपा उपमहापौर गजानन मगदूम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या मुख्य सोहळ्याला विधानपरिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांची उपस्थिती लाभली. प्रशासनाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे. सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे, अशोक माणकापुरे यांनी उपस्थित राहून राजमातांच्या स्मृतींना वंदन केले. याप्रसंगी बोलताना आयुक्त म्हणाल्या की, “राजमाता अहिल्यादेवींचे सुशासन, जलव्यवस्थापन आणि लोककल्याणकारी निर्णय आजच्या प्रशासनासाठी मार्गदर्शक आहेत.”कार्यक्रमाला महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी,स्थायी समिती सभापती अतुल मानेआणि विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, प्रभाग समिती ३ सभापती सौ. माया गडदे, गुंठेवारी समिती सभापती सौ. लक्ष्मी सरगर, गटनेते युवराज गायकवाड, आदी उपस्थित होते. तसेच माजी आमदार दिनकरतात्या पाटील, मा.जयश्रीताई पाटील , सौ. संगीता खोत, नगरसेवक संजय यमगर, दयानंद खोत, सुरेश बंडगर, विष्णू माने, दीपक वायदंडे, दरीबा बंडगर, नगरसेविका सौ. वर्षा सरगर, सौ. मीनाक्षी पाटील, सौ. योगिता राठोड, सौ. स्मिता यमगर, सौ. अश्विनी कोळेकर, माजी नगरसेविका सौ. वंदना सायमोते, माजी नगरसेवक मनगू आबा सरगर, शहाजी कोकरे, तसेच सुभाष देसाई, नागेंद्र भोसले यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.Website: http://satyarath.com/wp-admin
Leave a Reply