शिंदेसेनेचे शिलेदार महानगर प्रमुख प्रा मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन संपन्न; उद्योगमंत्री ना उदय सामंत यांची उपस्थिती
मिरजेतील गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक तसेच शिवसेना शिंदेसेनेचे शिलेदार आणि महानगर प्रमुख प्रा मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त गेली चार दिवस विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आज पूर्व म्हाडा कॉलोनी येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले यावेळी माजी सभापती सौ अनिता मोहन वनखंडे, नगरसेवक सागर वनखंडे, रवींद्र कबाडे, संजय लोणकर, दीपक बरूटे, श्री समर्थ मंदिर भक्त मंडळ तसेच पूर्व म्हाडा कॉलोनी येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय आणि हाताचे वाटप करण्यात आले. मिरजेची अस्मिता असणारा आणि नेहमी महापलिकडून दुर्लक्षित राहिलेल्या श्री गणेश तलावाची साफसफाई करण्यात आली यावेळी निसर्गप्रेमी सुधीर गोरे, रोटेरियन प्रा रवींद्र फडके यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला. आज रविवार रोजी मोफत नेत्रतपासणी शिबीर आयोजित करण्यात आले या शिबिराला देखील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. राज्याचे उद्योग मंत्री ना. उदयजी सामंत यांच्या उपस्थिती मध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा आणि पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. या सर्व कार्यक्रमाचे संयोजन सागर वनखंडे युवा मंच ने केले. यावेळी प्रा मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी मंत्रिमंडळातील मंत्री मोहोदयांनी प्रा वनखंडे यांना दूरध्वनी वरून शुभेच्छा दिल्या. यामध्ये जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितजीं कदम, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमदार सुहास बाबर, अमोल बाबर यांच्यासह सांगली जिल्हा वैद्यकीय कक्ष प्रमुख श्रेयस गाडगीळ, शिवसेना सांगली जिल्हा उपाध्यक्ष माधव गाडगीळ खा. श्रीकांत शिंदे यांनीही शुभेच्छा दिल्या.
Leave a Reply