प्रतिनिधी सुधीर गोखले
ऑनलाईन बेटिंग प्रकरणात इचलकरंजी मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आवाडे गटाचे कट्टर समजले जाणारे प्रभाग क्र १२ चे नगरसेवक गोट्या उर्फ नितेश पोवार याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नितेश हे भाजप चे नगरसेवक आहेत. ते राहुल आवाडे याचे निकटवर्ती समजले जातात. या बेटिंग संबंधी काही बड्या राजकीय क्षेत्रातील नावांची चर्चा सध्या शहरामध्ये सुरु असून पोलिसांच्या रडारवर अनेक व्यक्ती आहेत. एका चप्पलच्या गोदामातून आय पी एल च्या राजस्थान मुंबई या सामन्याचे ऑनलाईन बेटिंग सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळताच या ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केली असता. अमेय बडवे, अभिजित बडवे, गणेश पाटील उत्तमसिंग बग्गा याकूब मुजावर रिषभ पाटील हे सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सहा संशयितांची कसून चौकशी सुरु असून यामध्ये गोपनीयरित्या रात्री उशिरा नगरसेवक नितेश पोवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणामुळे शहरांमध्ये एकच खळबळ माजली आहे.
Leave a Reply