Advertisement

हॉटेल राही पॅलेस येथील छमछम .. कोणाच्या आशीर्वादाने…?? माहिती असूनही पोलीस प्रशासन गप्प का ??

प्रतिनिधी सुधीर गोखले

मिरज म्हैसाळ रस्त्यावर असणाऱ्या विजयनगर भागातील हॉटेल राही पॅलेसवर नुकतीच पोलीस विभागीय अधिकारी प्राणिल गिल्डा यांच्या पथकाने छापेमारी करत येथे सुरु असलेली ‘छमछम’ बंद पाडली मात्र या ‘छमछम’ सुरु करण्यामागील वरदहस्त कोणाचा होता याबाबत आता उलटसुलट चर्चा रंगली आहे. तर या हॉटेल मध्ये किती दिवसांपासुन अशा प्रकारच्या बेकायदा सुरु असलेला डान्सबार पोलीस प्रशासनाला कसा समजला नाही कामिरज ग्रामीण पोलीस ठाणे गांधारीच्या भूमिकेमध्ये होते असहिओ सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. येथे येणाऱ्या ग्राहकांना हाय प्रोफाइल बार बाला व्ही आय पी सेवा देत होत्या लाखो रुपयांची उधळत या हॉटेल मध्ये होत असे हे ग्रामीण पोलीस ठाण्यातील अंमलदारांना माहिती कसे नाही याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. तब्बल ग्राहकांना चार हजारांची एंट्री या बार मध्ये घेण्यात येत असल्याचे समजते. याबाबत या हॉटेल च्या मालकावर गुन्हा नोंद करण्यात येईलच मात्र पोलीस प्रशासनातले काही कर्मचारी यांना त्यांच्या वरिष्ठांच्या चौकशी फेऱ्यांनाही सामोरे जावे लागेल. माजी गृहमंत्री कई आर आर आबांनी त्यांच्या कारकिर्दी मध्ये डान्सबार बंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता मात्र या निर्णयाला हॉटेल राही पॅलेस ने अक्षरशः हरताळ फासली आहे. या ठिकाणी सुरु असलेला हा अनधिकृत डान्स बार कोणाच्या आशीर्वादाने सुरु होता याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!