Advertisement

जिल्ह्यातील इंधनाचा आजचा साठा समाधानकारक वाहनधारकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये; जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फ़ुलूके

प्रतिनिधी सुधीर गोखले

सध्या जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल ची तीव्र टंचाई जाणवत असताना आणि कित्तेक पेट्रोल पंप बंद असल्यामुळे आमच्या प्रतिनिधीनी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फ़ुलूके यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आज म्हणजेच शुक्रवारी घेतलेल्या इंधनाचा आढावा सविस्तर विशद केला ते म्हणाले,’प्रशासनाने जिल्ह्यातील आजच्या इंधन साठ्याची आकडेवारी घेतली असून ती पुढीलप्रमाणे आहे. आज पेट्रोलचा 2460 किलोलिटर, डिझेल 2875 किलोलिटर तर एलपीजीचा 567.3 मेट्रिक टन साठा शिल्लक असून 83.1 मेट्रिक टन एलपीजी जिल्ह्यामध्ये येण्याच्या मार्गावर आहे. तर जिल्ह्यात पेट्रोलचा आयओसीएल कंपनीचा 1320 किलोलिटर, बी.पी.सी.एलचा 610 किलो लिटर व एच.पी.सी.एलचा 530 किलोलिटर असा एकूण 2460 किलोलिटर साठा शिल्लक आहे. डिझेलचा आयओसीएल कंपनीचा 1445 किलो लिटर, बी.पी.सी.एलचा 780 किलोलिटर व एच.पी.सी.एलचा 650 किलोलिटर असा एकूण 2875 किलोलिटर साठा शिल्लक आहे. तर एलपीजीचा एचपीसीएल कंपनीचा 396 मेट्रिक टन, आय.ओ.सी.एल.चा 55 मेट्रिक टन व बी.पी.सी.एलचा 116.3 मेट्रिक टन असा एकूण 567.3 मेट्रिक टन साठा शिल्लक असून बीपीसीएलचा 83.1 मेट्रिक टन एलपीजी येण्याच्या मार्गावर आहे. कृपया नागरिकांनी घाबरून जाऊ नये अथवा पंपांवर इंधन भरण्यासाठी गर्दी करू नये प्रशासनाने इंधन पुरवठा करणाऱ्या कंपनी प्रतिनिधींना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. मागणीनुसार पुरवठा सुरु असून अफवांवर विश्वास ठेऊ नये. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!