प्रतिनिधी सुधीर गोखले
आखाती देशात असलेली युद्धजन्य परिस्थिती मुळे इंधनाचे विशेषतः कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे तेल कंपन्यांनी काही नुकतीच पेट्रोल डिझेल सह सीएनजी मध्ये केलेली दरवाढ आणि मागणीप्रमाणे मात्र मर्यादित झालेला इंधन पुरवठा यामुळे जिल्ह्यातील कित्तेक पंप काल अखेरीस बंद होते तर काही पंप वाहनधारकांमुळे हाऊसफुल्ल होते. पेट्रोल वाढीनंतर सांगली मध्ये पेट्रोल १०८ रु ६ पैसे तर डिझेल ने नव्वदी पार करत ९७ रु ६४ पैशाची मजल गाठली आहे. सांगली मिरजेतील पंपांवर गेल्या चार दिवसांपासून रोज वाहनधारकांची गर्दी होत आहे. विविध तेल कंपन्यांकडून मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने पंप चालकांकडून नाराजीचा सूर आहे. वाहन चालक इंधन दरवाढीच्या भीतीने गरजेपेक्षा जास्त पेट्रोल अथवा डिझेल आपल्या वाहनामध्ये भरत आहेत त्यामुळे पुरवठ्यावर ताण पडत आहे. मिरज आणि सांगली सारख्या महत्वाच्या शहरामध्ये टंचाई जाणवणार नाही याकडे पंप चालक आणि कंपन्या विशेष लक्ष देऊन आहेत मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागातून बरेच पंप सोमवारी बंद होते सध्या डिझेल ची विक्री हि मर्यादित झाली आहे २०० लिटर पेक्षा जास्त विक्री करणारे पंप आपोआप लॉक होत आहेत. याचा फटका शेतीकामाला बसला आहे. मात्र याबाबत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात पुरेसा इंधन साठा असल्याचा दावा केला असून नागरिकांनी काटकसरीने इंधनाचा वापर करण्याचे आवाहनही केले जात आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फ़ुलूके म्हणाले.’जिह्यामध्ये वतमान स्थितीमध्ये पेट्रोल २४१० किलो लिटर तर डिझेल २७३२ किलो लिटर इतके उपलब्ध आहे. आम्ही इंधन पुरवठादार कंपन्यांना योग्य त्या सूचना वेळोवेळी देत आहोत. दररोज जिल्ह्यातील इंधन साठ्यावर आमच्या विभागाचे लक्ष आहे.तसेच एल पी जी चाही पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे.
Leave a Reply