प्रतिनिधी सुधीर गोखले
सांगलीच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन (International Nurses Day) अत्यंत उत्साहात संपन्न झाला। ‘आमच्या परिचारिका. आमचे भविष्य. सक्षम परिचारिका जीव वाचवतात’ या मुख्य संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक नर्सिंगच्या जनक ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक आणि इतर वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव यांनी आपल्या मनोगतामध्ये शासकीय रुग्णालयातील परिचारिकांचे काम अभिमानास्पद असल्याचे म्हणले. पद्मभूषण डॉ वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय मधील टी एन ए क्लब, आणि सर्व संवर्ग परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या वतीने जागतिक परिचर्या दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसंगी शासकीय रुग्णालयाच्या अधिसेवीका आणि टी एन ए क्लब च्या अध्यक्षा अंजली वेदपाठक होत्या. या कार्यक्रमामध्ये डॉ श्रीकांत अहंकारी, डॉ विकास देवकारे, आशिष भोरे प्राचार्या वसुधा पवार, मानसी गवळी विजय पाटील आदी उपस्थित होते. अधिष्ठाता डॉ गुरव म्हणाले, रुग्णसेवेत अत्यंत महत्वाचे कार्य हे परिचारिका करत असतात. अक्षरशः डोळ्यात तेल घालून त्या रुग्ण सेवा करतात हे अभिमानास्पद आहे. यावेळी विविध क्षेत्रातील परिचारकांचा गौरव करण्यात आला.
Leave a Reply