प्रतिनिधी सुधीर गोखले
श्री अंबाबाई तालीम संस्थेचे कुटुंबप्रमुख आणि दै जनप्रवास चे समूह संपादक जेष्ठ राजकीय विश्लेषक आणि राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजयजी भोकरे यांच्या हत्येचा कट पोलिसांनी काल उधळून लावत तिघा संशयित आरोपींना हत्यार सह जेरबंद केले. याबाबत अधिक माहिती देताना अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी सांगितले कि आमच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण चे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार आणि त्यांचे पथक गस्तीवर असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संजय भोकरे यांच्या हत्येसाठी तयारीत असलेले तीन तरुण शस्त्रांसह पांढऱ्या मोटारीमधून फिरत असल्याचे समजले. माहितीनुसार पोलिसांनी तातडीने हालचाल करत राजू गंगवाणी यांचं शेताजवळ सापळा रचला त्या ठिकाणी अंधारात एक मोटार संशयास्पद रित्या थांबलेली आढळून आली मोटारीची झडती घेतली असता तीन तरुण घटक शस्त्रानिशी आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी देशी बनावटीची दोन पिस्तुले जिवंत काडतुसे,आणि मोटार जप्त केली असून प्राथमिक तपासामध्ये जमिनीच्या वादातून संजय भोकरे यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी गणेश चंद्रकांत लोखंडे (रा लक्ष्मी पार्क हरिपूर रस्ता सांगली वय ३३) विराज प्रकाश बुटले( आंबेडकर रास्ता सांगली वय ४१) आणि संग्राम संभाजी फडतरे( पाटणे प्लॉट हरिपूर रस्ता सांगली वय २७) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे यामधील संशयित बुटले याने पोलिसाना कबुली देताना त्याची सचिन आवळे (सांगलीवाडी) याच्याशी ओळख झाली. संजय भोकरे यांच्या ताब्यात असलेली जमीन सोडवून घेण्यासाठी आणि त्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारातून मिळणाऱ्या फायद्यासाठी त्यांनी संजय भोकरे यांच्या हत्येचा कट रचल्याचे सांगितले या कामासाठी सचिन आवळे याने संशयितांना पैसे पुरवले. फेब्रुवारी २६ मध्ये उत्तर प्रदेश मधील सोनभद्र मधून या संशयितांनी पिस्तूल खरेदी केली मात्र पोलिसांच्या सतर्कतेने हा कट उधळला.
Leave a Reply