Advertisement

डॉ. प्रशांत सांगडे यांना “Excellence in Homeopathy” पुरस्कार

पाचोरा  : डॉ. प्रशांत सांगडे यांना “Excellence in Homeopathy” पुरस्कार

 

पाचोरा : होमिओपॅथी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व रुग्णसेवा केल्याबद्दल डॉ. प्रशांत सांगडे यांना Vital Homeopathic Forum तर्फे देण्यात येणारा “Excellence in Homeopathy” हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. Vital Homeopathic Forum ही संस्था दरवर्षी होमिओपॅथी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांना विविध पुरस्कारांनी गौरविते. यावर्षी लखनऊ येथील प्रख्यात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. गिरीश गुप्ता यांनाहीLegend in Homeopathy” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संभाजीनगर येथे आयोजित नॅशनल होमिओपॅथी सेमिनार मध्ये डॉ. प्रशांत गँगवाल, डॉ. राजेंद्र श्रीमाळी, डॉ. प्रवीण बीडकर, डॉ. संजीव डोळे व डॉ. कांचन देसरडा यांच्या हस्ते डॉ. सांगडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. प्रशांत सांगडे हे गेल्या दोन दशकांपासून पाचोरा सारख्या ग्रामीण भागात होमिओपॅथीची सेवा देत आहेत. त्यांचे पदवीचे (BHMS) शिक्षण सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, बीड येथे झाले असून पदव्युत्तर (MD) शिक्षण गुरु मिश्री होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, जालना येथे पूर्ण झाले आहे. त्यांनी तृतीय वर्ष BHMS परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक मिळविला होता. तसेच त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल MUHS नाशिक येथे ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व कुलगुरू यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता. डॉ. सांगडे यांनी आजवर हजारो रुग्णांवर उपचार करून अनेकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवले आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे व वैद्यकीय क्षेत्रातील योगदानामुळे त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे. या सन्मानाबद्दल रोटरी क्लब ऑफ पाचोरा-भडगाव, पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तसेच मित्रपरिवारातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!