लाडगाव मंडळात अतिवृष्टी ओढे नाल्यांना आले नद्यांचे स्वरूप. शासनाने पंचनामा करून त्वरित मदत करावी शेतकऱ्यांची मागणी
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

वैजापूर तालुक्यासह ठीक ठिकाणी अतिवृष्टी ढग फुटी सारखे प्रमाण झालेले आहे काल रात्रभर इतका पाऊस झाला की ओढे व नाल्यांना नदीचे स्वरूप आले जिकडेतिकडे पाणीच पाणी मक्का असेल सोयाबीन असेल कपाशी असेल व इतर काही पीक सगळे पीक पाण्याखाली गेले शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास या अतिवृष्टीने हिसकावून घेतला एक तर रब्बी पीक म्हणजे कांदा कांद्यांना भाव नाही त्यातच कसतरी खरीपच पीक घेऊन शेतकरी आनंद होण्याच्या दृष्टिकोनात होता परंतु आता तेही पीक आपल्या हातात येणार नाही त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडलाय लाडगाव कापूस वाडगाव विरगाव नादी बऱ्याच ठिकाणी ढगफुटीचे प्रमाण झालेले आहे तरी प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.

















Leave a Reply