Advertisement

पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा भडगाव ची जोरदार सुरुवात 

पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा भडगाव ची जोरदार सुरुवात 

पाचोरा : डॉक्टर्स डे निमित्त पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी यांचे सत्कार प्रसंगी डॉ सतीश टाक, डॉ अमित साळुंके, डॉ विजय पाटील, डॉ इम्रान शेख यासमवेत नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ मुकेश तेली, सचिव डॉ अजयसिंग परदेशी, डॉ घनश्याम चौधरी, डॉ गोरख महाजन, डॉ अमोल जाधव, डॉ बाळकृष्ण पाटील, डॉ पवन पाटील, चंद्रकांत लोढाया, निलेश कोटेचा, राजेश मोर, प्रदिप पाटील, डॉ पंकज शिंदे, डॉ शिवाजी शिंदे तसेच नविन सदस्य डॉ कुणाल पाटील, डॉ प्रशांत सांगडे, डॉ सिद्धांत तेली, प्रज्ञेश खिलोशिया, संजय कोतकर तसेच इतर रोटरी सदस्य अमोल झेरवाल,डॉ राहुल काटकर, डॉ किशोर पाटील या प्रसंगी हजर होते.

तसेच जिल्हा परिषद कन्या शाळा जामनेर रोड, पाचोरा येथे शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक व दातांची काळजी आणि स्वछता या विषयावर मार्गदर्शन पर Financial करण्यात आले. यावेळी दातांची निगा या विषयावर डॉ. अमोल जाधव, अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन आणि लसीकरण आणि त्याचे महत्व आणि सचिव डॉ अजयसिंग परदेशी यांनी समतोल आहार आणि त्याचे महत्व यावर मार्गदर्शन केले.या वेळी रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे पदाधिकारी समवेत प्राध्यापक इंगळे सर, शाळेतील शिक्षक,शिक्षिका सोबत मुख्याध्यापिका हिवरे मॅडम, विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि पालक देखील आवर्जून हजर होते.यासोबत मुलांना केळे आणि खाऊ वाटप करण्यात आला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!