सत्यार्थ न्युज प्रतिनिधी :- किरण माळी (जळगांव,महाराष्ट्र)
श्री घृष्णेश्वर मंदिर, वेरूळ संभाजीनगर येथे आयोजित श्रीयंत्र पूजन सोहळ्याच्या प्रचारार्थ जळगाव विभागातील धरणगाव येथे गुरुपुत्र आदरणीय नितीन भाऊ मोरे यांचा प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन व आढावा बैठक उत्साहात संपन्न.
धरणगाव येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे दि.1जानेवारी 2025 बुधवार रोजी दुपारी 4.30 वाजता नितीनभाऊ मोरे यांचे शुभ आगमन केंद्रात झाले. प्रथम त्यांचे औक्षण करण्यात आले. तदनंतर त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रवीण बडगुजर सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील जिल्हाप्रमुख विजय निकम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख नितिन भाऊ मोरे यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेचा प्रतिमेला वंदन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. नितीन भाऊंचा सत्कार निकम साहेब, बोरसे साहेब, आर. पी. पाटील, राकेश मकवाने यांच्या हस्ते करण्यात आला.
नितिन मोरे यांनी आपल्या हितगुजातून उपस्थित सेवे कऱ्याना मार्गदर्शन केले. त्यात गुरु प्रणाली श्री दत्त महाराज पासून ते दिंडोरी प्रणित मार्गाची रचना कशी झाली, तसेच दिंडोरी प्रणित मार्गाच्या विस्तार 21 देशात सुरू आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा इतिहास तसेच ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग अध्यात्मिक कार्य पूर्ण होण्यासाठी 18 विभागातून कार्य करणे आवश्यक आहे. या मार्गात 20 टक्के अध्यात्म व 80 टक्के सामाजिक कार्य केले जात असते कृषी जागर विषयी माहिती देण्यात आली परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन सानिध्यात 21 जानेवारी 2025 रोजी श्री घृष्णेश्वर वेरूळ संभाजीनगर येथे होणाऱ्या श्री चक्रराज श्रीयंत्र पूजनाचे महत्त्व व श्रीयंत्राचे प्रकार व महत्व विशद करण्यात आले. तसेच सेवेकऱ्यानी केंद्रात सणवारव्रत उत्सव आयुर्वेदिक विभाग, वास्तुशास्त्र कृषी शास्त्र देव देव्हारा बाल संस्कार असे 18 विभागाचे प्रात्यक्षिक स्टॉल लावुन आलेल्या सेवेकरांना मार्गदर्शन करण्यात आले सामुदायिक प्रार्थना तसेच राष्ट्रगीताने कार्यक्रमाच्या समारोप करण्यात आला आभार प्रदर्शन कुणाल ठाकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी केंद्रातील सेवे कऱ्यानी परिश्रम घेतले.