Advertisement

आव्हानी (जिल्हा जळगाव) येथे ‘हिंदुराष्ट्र आव्हानी’ फलकाचे अनावरण !

सत्यार्थ न्युज प्रतिनिधी – किरण माळी (जळगांव, महाराष्ट्र)

गावागावातून होत आहे हिंदु राष्ट्राची मागणी !

                                                                                                                                   

   धरणगाव तालुक्यातील आव्हानी गावात ‘हिंदुराष्ट्र आव्हानी’ अशा फलकाचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे जळगांव जिल्हासंघटक श्री. यशवंत चौधरी, श्री. विनोद शिंदे, श्री. निखिल कदम तसेच गावातील माननीय सरपंच श्री. जानकीराम दामोधर पाटील, उपसरपंच श्री. दिलीप दगा पाटील, श्री. ईश्वर भिल, गावातील अन्य प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. आव्हानी गावातील जिज्ञासू, धर्मप्रेमी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. हिंदुराष्ट्र या ध्येयाने जिल्ह्यातील युवक प्रेरित होत असून हिंदु धर्माप्रती निष्ठा त्यांच्यात दिसत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!