गडचिरोलीत नदीत बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू
पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी संपर्क 9423170716
गडचिरोली,,
नदीत डूबुन एका विद्यार्थ्याचा मृत्यू,तीघे बचावले वैनगंगा नदीच्या काठावर बोरमाळा घाटावरील चारही मुले बुडाल्या नंतर त्यांनी आरडाओरडा केला. नदी काठावर असलेल्या ताजू फय्याज शेख यांनी धावत जाऊन उडी घेतली.
गडचिरोली शहरापासून जवळच असलेल्या वैनगंगा नदीच्या बोरमाळ घाटातील पाण्यात बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर सुदैवाने यातिल तिघे थोडक्यात बचावले हि घटना 30 नोव्हेंबरला दुपारी 2 च्या सुमारास घडली. दरम्यान उत्तरीय तपासणीला विरोध करत नातेवाईकांनी मृत्य मुलाचे शव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जयंत आझाद शेख (10, रा तेल्ली मोहल्ला, हनुमान वार्ड, गडचिरोली) असे मृत मुलाचे नाव आहे, रियाज शब्बीर शेख 14,, जिशान फय्याज शेख, 15 ,, लड्डू फय्याज शेख 13 सर्व रा. तेल्ली मोहल्ला हनुमान वार्ड गडचिरोली हे बालंबाल वाचले हे सर्वजण एकत्र मिळून 30 नोव्हेंबरला दुपारी शहराजवळील बोरमाळ नदी घाटावर फिरायला गेले होते. सोबत जिशान व लड्डू फय्याज याची आई या देखील सोबत होते.
वैनगंगा नदी पात्रातील खोल पाण्याचा प्रवाह कमी झालेला आहे. पण पत्रातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मौजमजा म्हणून उतयलेली चारही मुले एका पाठोपाठ एक अशी बुडाली
दरम्यान यातील जयंत शेख यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून मृत्यू घोषित केले. इतर तिघे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आल्याची नोंद नाही.
या घटनेनंतर हनुमान वार्ड तेल्ली गल्लीत मोठी गर्दी केली होती. याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात उशीरापर्यंत नोंद झालेली नव्हती.
नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालयात मोठा गोंधळ
जयंत शेख यांच्या मृत्यूनंतर जिल्हा रुग्णालयात प्रशासनाने पोलिसांच्या माहितीनुसार शवविच्छेदन करण्याची तयारी केली. मात्र नातेवाईक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते 20ते 25 नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ करून सुरक्षारक्षक परीचारीकेशी हुज्जत घातली त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन तो दुचाकीवर नेला अशी माहिती प्रत्यक्षदर्शी घडली आहे.
🔷 पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी 🔷
🔷संपर्क 9423170716🔷