सत्यार्थ न्युज प्रतिनिधी – किरण माळी (जळगांव, महाराष्ट्र)
धरणगाव – शहरातील लाडक्या बहिणीच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांचे प्रतिपादन विधानसभेच्या निवडणुका संपल्या असून त्यात लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले असून जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील साहेब हे सुद्धा 59 हजार 232 एवढ्या मताधिक्यांनी निवडून आले परंतु धरणगाव शहरातील काही लाडक्या बहिणींनी पाण्यासाठी भाऊंवर रोष दाखविल्याचे आम्हाला जाणवत आहे.त्यामुळे आता भावी मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या सहकार्याने धरणगाव शहरातील लाडक्या बहिणींचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून लवकरात लवकर वेळेवर पाणी कसे मिळेल यासाठी मुख्याधिकारी पाणीपुरवठा अधिकारी जीवन प्राधिकरण उपअभियंता केडीझाडे साहेब व ठेकेदार माखणे व त्यांचे कर्मचारी यांच्या पाठीमागे लागून पाण्याच्या प्रश्न सोडविण्यात येईल कालच या सर्व पदाधिकाऱ्यांची मी स्वतःभेट घेतली संपूर्ण माहिती जाणून घेतली स्वतः फिल्टर प्लॅनवर जाऊन परिस्थितीची पाहणी केली फक्त आता नियोजन करणे हे महत्त्वाचे असून अतिशय किरकोळ किरकोळ बाबी असून त्याकडे लक्ष द्यावे लागेल धरणगाव शहरातील 27 कोटीची योजना पूर्णत्वास आली असून संपूर्ण पाईपलाईन बदलविण्यात आली आहे जवळ जवळ 95 टक्के कनेक्शन दिले गेले आहेत. अजून ज्यांची मागणी आहे त्यांना सुद्धा कनेक्शन दिले जात आहेत काही भागांमध्ये टेस्टिंग चे काम सुरू आहे त्यात प्रामुख्याने अर्धा माळीवाडा,पाताल नगरी,सत्यनारायण चौक,मराठे गल्ली,खाटीक वाडा या भागांमध्ये टेस्टिंग बाकी आहे त्यामुळे वेळेवर पाणी देण्यात अडचणी येतात अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आता या कामांना गती देऊन हा प्रश्न कायमस्वरूपी सर्वांच्या सहकार्याने आपल्याला मार्गी लावायचा आहे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या कामाला जास्तच उशीर झाल्याचे दिसून येते आता कोणत्याही परिस्थितीत हलगर्जीपणा चालणार नाही ठेकेदाराने लवकरात लवकर जास्तीचे कर्मचारी लावून हा प्रश्न मार्गी लावावा वास्तविक पाहता यात गुलाबराव पाटील साहेब यांच्या काही दोष नाही योजना मंजूर करून शासनाकडून निधी आणून देणे हे काम मंत्री असल्यामुळे झाले लोकांना वेळेवर सुविधा पुरविणे ज्या ठेकेदाराकडे ज्यांनी काम घेतले त्यांनी हे करायला पाहिजे होते अनेक वेळा नागरिकांना असे वाटते गुलाबराव पाटील साहेब हे या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी अधिकारांची झाड झडती घेऊन वेळेवर काम करायला सांगायला पाहिजे होते. परंतु मित्रांनो अनेक वेळा जीवन प्राधिकरणाचे अधिकारी असतील नगरपालिकेचे कर्मचारी असतील ठेकेदार असतील यांची बैठका घेऊन झापले सुद्धा आहे परंतु ठेकेदार वेळोवेळी तांत्रिक अडचणी कारणे दाखवून वेळ काढून घेत होते कोणत्याही लोकप्रतिनिधी असे वाटत नाही की आपण जनतेची कामे करायला पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे कामही वेळेवर व्हायला पाहिजे परंतु अनेक वेळा ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे भाऊंना रोशाला सामोरे जावे लागले शिवाय प्रशासक असल्यामुळे नगराध्यक्ष,नगरसेवक यांनी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांशी कार्यालयात जाऊन समस्या मांडल्या सुद्धा आंदोलने सुद्धा झाली उपोषणे झाली मोर्चे आले परंतु प्रत्येक वेळेस अधिकाऱ्यांनी हो सांगून वेळेवर काम पूर्ण झालं नाही प्रशासक असल्यामुळे लोकप्रतिनिधींना सुद्धा जास्त काही अधिकार नसतात त्यामुळे मनमानी कारभार निश्चितच झाला या तीळ मात्र शंका नाही अनेक वेळा फिल्टर पाण्यामध्ये दुर्गंधीच्या वास येतो अशा तक्रारी केल्या गेल्या ज्या वेळेस काल मी स्वतः फिल्टर प्लॅन भेट द्यायला गेलो त्यावेळेस क्लोरीन टॅंक नादुरुस्त असल्यामुळे पाण्यामध्ये दुर्गंधी येते ते अजूनही ना दुरुस्त आहे यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे मुख्याधिकारी रुजू झाल्यानंतर लागलीच आचारसंहिता लागल्यामुळे त्यांना पदभार स्वीकारता आला नाही व कामाला सुरुवात करता आली नाही आता त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले मी पूर्ण वेळ नगरपालिकेत देईल आणि प्राधान्याने पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष देईल त्यांच्या सत्कार करण्यासाठी गेलो असता त्यांनी सांगितले 8 दिवसाचे पाणी ज्यावेळेस 6 दिवसावर येईल त्यावेळेस मी सत्कार स्वीकारेल त्यामुळे त्यांच्या बोलण्यावरून ते निश्चितच पाण्याच्या प्रश्न सोडवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.धरणगावातील नागरिकांनी सुद्धा नगरपालिकेला सहकार्य करून सर्व मिळून आपण सर्वात प्रथम पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू व या कामासाठी मी स्वतः आमच्या सर्व सहकारी सहकार्य करतील गुलाबराव पाटील साहेब यांच् सहकार्य घेऊन फिल्टर प्लॅन असेल धावडा असेल गुड प्रकल्प असेल किंवा जीवन प्राधिकरण कार्यालय मंत्रालय ज्या ज्या ठिकाणी जाण्याची वेळ येईल त्या ठिकाणी जाऊन धरणगाव शहरातील माझ्या लाडक्या बहिणीं सह शहराच्या पिण्याच्या पानाच्या प्रश्न मार्गी लावणार मी नगराध्यक्ष असताना सर्वांच्या सहकार्याने धरणगाव फिल्टर प्लॅन व मार्केट कमिटी स्मशानभूमी हे दोन कामे नगराध्यक्ष असताना कायमस्वरूपी आठवणी राहतील असे काम केले आहे हा सुद्धा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही असे प्रतिपादन पी एम पाटील सर माजी नगराध्यक्ष धरणगाव यांनी केले.