सत्यार्थ न्यूज प्रतिनिधी – किरण माळी
दिनांक 8 नोव्हेंबर रोजी धरणगाव शहरात गुलाबराव पाटील साहेब यांच्या प्रचारानिमित्त जि प सदस्य प्रतापराव पाटील,शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,भाजपा उपजिल्हा प्रमुख एडवोकेट संजय महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 6 वाजता धरणगाव शहरातील मोठा माळीवाडा बडगुजर गल्ली, घोडे गल्ली,बालाजी मंदिर,जैन गल्ली परिसर लोहार गल्ली अशा विविध भागातून वाजत गाजत मोठ्या उत्साहाने प्रचार रॅली करण्यात आली लाडक्या बहिणींद्वारे ठिकठिकाणी प्रतापराव पाटील,पी एम पाटील सर यांना मोठ्या प्रमाणात भगिनींनी पूजन केले व गुलाबराव पाटील साहेब यांना निवडून येण्यासंदर्भात शुभेच्छा दिले वाजत गाजत घोषणा देत मोठ्या प्रमाणात महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला मंडळ सहभागी झाले होते सर्वच कार्यकर्त्यांनी फार मोठ्या फरकाने गुलाबराव पाटील साहेब यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली असून नागरिकांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
या प्रसंगी महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे शहर प्रमुख दिलीप भाऊ महाजन, कन्हैया रायपुरकर,शिवसेना गटनेते पप्पू भावे,शहर प्रमुख विलास महाजन,नगरसेवक विजय महाजन,नगरसेवक सुरेश महाजन,कमलेश तिवारी,तोसीफ पटेल,शहर प्रमुख भारतीताई चौधरी,सुनिता पाटील,दीक्षा गायकवाड,रेखा पाटील, प्रमिलाताई रोकडे,भैया भाऊ महाजन,संतोष महाजन,पवन महाजन,मच्छिंद्र पाटील,भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कैलास माळी सर,वाल्मीक पाटील,भैय्या महाजन,नगरसेवक सुरेश महाजन,आरपीआयचे नवल खंडारे,नगरसेविका अंजली ताई विसावे,हेमंत भाऊ चौधरी तालुका संघटक,संजय भाऊ चौधरी तालुका उपाध्यक्ष, शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.