प्रतिनिधी- तुषार मारुती केंगार
सोलापूर जिल्हा
माळशिरस विधानसभेसाठी सोमनाथ भोसले यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
254 माळशिरस विधानसभा निवडणुकीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष व माळशिरस तालुका अनुसूचित जाती हक्क संरक्षण कृती समिती सदस्य सोमनाथ भोसले यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज सोमवार 28 नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला.
अनुसूचित जातीचा खोटा दाखला काढून अनुसूचित जातीमध्ये घुसखोरी करून निवडणूक लढणाऱ्या उत्तम जानकर यांच्या विरोधामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला असून तालुक्यातील अनुसूचित जातीतील सर्व पक्षांनी एकत्रित येऊन माळशिरस तालुका अनुसूचित जाती हक्क संरक्षण कृती समितीची स्थापना करून गेली दोन महिन्यापासून या कृती समितीच्या बैठका सुरू असून या जातचोराविरुद्ध एकत्रित लढण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे या कृती समिती मधूनही त्यांनी उमेदवारीची मागणी केली असून अजूनही या कृती समितीची उमेदवारी जाहीर झालेली नाही त्यामुळे या कृती समितीमधून त्यांना उमेदवारी जाहीर झाली तर ते चांगली लढत देऊ शकतात.
उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे, तालुका उपाध्यक्ष पांडुरंग चव्हाण तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका सहसंपर्कप्रमुख रोहिदास तोरणे इंदापूर तालुका प्रभारी संतोष गायकवाड अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे,कायदेशीर सल्लागार प्रदीप कदम तालुका युवक सरचिटणीस तुषार केंगार,अकलूज शहर महिला आघाडी अध्यक्ष स्वाती धाईंजे, तालुका युवक प्रसिद्धी प्रमुख संदीप तोरणे सहप्रसिद्धीप्रमुख योगेश ढावरे निमगाव शहराध्यक्ष सुनील तोरणे बाबासाहेब ननवरे मनीष ननवरे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी भीमसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते