शिवणकाम (टेलर) काम करणाऱ्यांचा मुलगा झाला क्लास टू अधिकारी लाडगावकरांची कौतुकाची थाप
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

अतिशय घरातली परिस्थिती नाजूक आई-वडील शिवणकाम (टेलर )करतात एक गुंठा ही जमीन नाही ग्रामीण भागातील मुलाने करून दाखविले उत्कृष्ट काम विनोद दत्तात्रय अकोलकर मुक्काम पोस्ट लाडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर चौथीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषद लाडगाव नंतर पाचवी ते दहावी न्यू हायस्कूल लाडगाव व नंतर अकरावी व बारावी एसएस जी एम कोपरगाव. नंतर मेकॅनिकल इंजिनियर एस एन डी कॉलेज येवला व नंतर अतिशय मेहनत करून कुठल्याच प्रकारचा क्लास न लावता एमपीएससीचा अभ्यास करून मिळविला विजय व थेट अन्न व नागरी पुरवठा विभाग वैध मापन शास्त्र निरीक्षक पदी निवड class 2 post.
24 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई या ठिकाणी परीक्षा दिली व आता 24 सप्टेंबर 2024 रोजी निकाल लागला. जिद्द चिकाटी मेहनत केली तर आपण जग जिंकू शकतो. माझी घरची परिस्थिती खूप नाजूक आहे होती आई वडील टेलर काम करून आमचं घर चालवत होते ग्रामीण भाग असल्याने फारसा पैसा उपलब्ध होत नव्हता तरीही वडिलांनी दुसऱ्याची शेतजमीन करून शेतीचे कामे करून माझं शिक्षण पूर्ण केलं मी एमपीएससीचा अभ्यास करत असताना दोन दोन तीन घंटे पाणी सुद्धा पीत नव्हतो कधी भूक पण लागत नव्हती कारण समोर आठवत होती ती घरची परिस्थिती आपल्याला काहीतरी करायचंय काहीतरी बनवून दाखवायचं असे जिद्द मनाला होती आणि आज सर्वांच्या साक्षीने ती पूर्ण झाली…
विनोद दत्तात्रय अकोलकर
याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित योगीराज ठोंबरे रामेश्वर जाधव राहुल संत उपस्थित होते.

















Leave a Reply