जगदीश जाधव पाटील
जिल्हा प्रतिनिधी,
नांदेड.
नांदेड – शिवसेना युवा जिल्हा अध्यक्ष पदी युवा नेते श्री विकास देशमुख चीदगिरीकर ह्यांची निवड.
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री
श्री एकनाथ जी शिंदे ह्यांच्या आदेशाने आणि मा. खासदार श्री श्रीकांत शिंदे ह्यांच्या मार्गदर्शन तसेच युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक ह्यांच्या विनंतीने शिवसेना शिंदे गटाच्या नांदेड जिल्ह्यातील युवा नेते श्री विकास देशमुख चीदगिरीकर ह्यांची भोकर विधानसभा नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी आज रोजी मुंबई कार्यालय येथे निवड करण्यात आली.
श्री विकास देशमुख हे मा. खासदार हेमंतभाऊ पाटील ह्यांचे समर्थक म्हणून पूर्ण जिल्ह्यात ओळखले जातात.
त्यांनी आज पर्यंत सामाजिक कार्यातून बऱ्याच गरजवंताला मदतीचा हात दिला आहे.
त्यांच्या निवडी मुळे भोकर विधानसभेतील युवा कार्यकर्त्यातून अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर केला जातोय, एक सामान्य कार्यकर्ता ते जिल्हा अध्यक्ष इथ पर्यंतचा प्रवास हा आदर्श घेण्यासारखा आहे असे जनसामान्यांच्या आजच्या शुभेच्छांच्या वर्षावात दिसत आहे.