कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यांच्या सीमेवर पसरलेल्या दंडोबा डोंगर रांगेच्या पायथ्याशी मिरज पंढरपूर रस्त्यालगत खरशिंग गावच्या हद्दीवर असलेले श्री क्षेत्र दळे अतिशय शांत रमणीय ठिकाण असलेले श्री क्षेत्र दळे दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी आहे. अगदी महामार्गा लगत उजवीकडे खरशिंग गावाकडे आपण वळालो कि रस्त्याच्या डाव्या हाताला हे तीर्थ क्षेत्र दिसते. भारतीय सनी दलातून निवृत्त झालेले सुभेदार संपतराव पाटील यांच्या संकल्पनेतून हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे ठिकाण स्थापित झाले आहे. तसेच मिरजेतील थोर स्वामी भक्त उद्योजक रवींद्र कबाडे यांच्यासह रवींद्र भगत आणि असंख्य स्वामी भक्तांच्या प्रयत्नातून या पवित्र ठिकाणी उभ्या असलेल्या मंदिराला आकार आला आहे. नुकताच या तीर्थक्षेत्राचा पहिला वर्धापन दिवस अगदी धार्मिक आणि आध्यत्मिक परंपरेने संपन्न झाला. काही थोर विभूतींच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थिती मध्ये होम हवं आणि इतर धार्मिक विधी पार पडले. सर्वप्रथम या श्री क्षेत्र दळे या स्थळी एक अद्भुत अशी अनुभूती देणाऱ्या घटना या क्षेत्राचे निवृत्त सुभेदार संपतराव पाटील यांच्या आयुष्यात घडल्या नंतर त्यांनी या क्षेत्रामध्ये सुंदर अशी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती त्याच बरोबर श्री शंकराची पिंड स्थापन करण्याचे ठरवले त्याप्रमाणे मिरज येथील त्यांचे स्नेही आणि स्वामीभक्त रवींद्र कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या छोटेखानी मंदिराचे काम सुरु झाले. बघता बघता कोकण भागात प्रसिद्ध असलेल्या लाल चाऱ्याच्या दगडातून मंदिर उभे राहिले रवींद्र कबाडे गुरुजींच्या मनातील स्वामी समर्थांची सुंदर अशी मूर्ती राजस्थान येथून मूर्तिकारांनी घडवून मिरजेकडे पाठवली साधारण २ ते अडीच फूट अशी सुंदर मूर्ती खूप विलक्षण भाव दर्शवते. आज या तीर्थक्षेत्राला एक वर्ष पूर्ण झाले अनेक हातांना या तपोभूमीने मोलाचे आज पर्यन्त घडवले आहे. अनेकांच्या इच्छा पूर्ण करणारे असे श्री क्षेत्र दळे ग्रामी एकवेळ अवश्य भेट द्यावी आणि एका अद्भुत अशा अनुभूतिची प्रचिती घ्यावी.Website: http://satyarath.com/wp-admin
Leave a Reply