सांगली जिल्ह्यातील अवैध मद्य तस्करी विक्री किंवा उत्पादनाबाबत आमच्या विभागाने नेहमीच सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. अलीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये विषारी मद्य प्राशन करून ज्या व्यक्ती दगावल्या आहेत त्याबद्दल मला निश्चितपणे खेद आहे. मात्र असे नाही कि पुणे प्रकरण झाल्याने आमच्या कारवायांना अधिक जोर लागला आहे मात्र उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाने आम्ही जिल्ह्यात अधिक गतिमान झालो आहोत असे स्पष्ट मत सांगली जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे आणि उपाधीक्षक दीपक सुपे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले आम्हाला नेहमी मिळत असणाऱ्या गोपनीय माहितीनुसार या कारवाया सुरु आहेत.जिल्ह्यातील अनेक हातभट्ट्या आमच्या विभागाने उध्वस्थ केल्या आहेत. नुकतीच सांगली येथील उत्तर शिवाजीनगर आणि १०० फुटी रस्त्यालगत आमच्या मिरज विभागाने जोरदार कारवाई करत लाखो रुपयांना गोवा मेड विदेशी मद्यसाठा हस्तगत करून दोन संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत आता तपस अजूनही सुरू आहेत या मद्य तस्करीची पाळेमुळे आम्ही खोदून काढत आहोत यामध्ये कोणाचाही मुलाहिजा आम्ही बाळगणार नाही. सध्या मी व फिल्ड काम करत आहे त्यामुळे कार्यालयीन वेळेत अभ्यागत भेटीसाठी माझे सहकारी अधिकारी प्रभारी उपाधीक्षक दीपक सुपे उपस्थित असतात. आमच्या कामगिरीचा आलेख असाच चढता राहणार आहे. प्रथम सर्वच प्रिंट मीडिया आणि इलेट्रॉनिक मीडिया चे मी मनापासून आभार मानतो कि मीडिया मुळे आमची कामगिरी हि आमच्या वरिष्ठांपर्यंत पोचू शकते. आमच्या विभागाने केवळ तीन दिवसात ४१ ठिकाणी छापेमारी करत २९ जणांना ताब्यात घेतले. गतवर्षात आम्ही एकूण तब्बल १७०० जणांना अटक केली आहे. फक्त गेल्या तीन दिवसांमध्ये ५ लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केला आहे काही ठिकाणी ग्रामीण भागात मद्याचे दर वाढल्याने गावठी हातभट्टी दारू गाळली जाते प्रश्न केली जाते. मात्र आम्ही त्यावरही अंकुश ठेवला आहे. आमच्या मिरज विभागाचे दुय्यम निरीक्षक अजय लोंढ त्यांच्या सह जयसिंग खुटावळे आणि लक्ष्मण पोवार यांच्या सह जवान स्वपिन अटपाडकर स्वप्नील कांबळे शाहीन शेख आणि कविता सुपने यांनी चांगली कामगिरी बजावली आहे सध्या जिल्ह्याभरात आमचे भरारी पथकही ढाबे आणि हॉटेल वर बारीख लक्ष ठेऊन आहे. तरीही मी नागरिकांना आवाहन करतो, जर महापालिका क्षेत्रामध्ये किंवा ग्रामीण भागात अवैध पद्धतीने मद्य विक्री किंवा वाहतूक आगर उत्पादन होत असेल तर आमच्या विभागाला तातडीने कळवा तात्काळ आमची त्यावर ऍक्शन घेऊ.Website: http://satyarath.com/wp-admin
Leave a Reply