प्रतिनिधी सुधीर गोखले
अत्यंत रंगतदार होत असलेल्या सांगली आणि सातारा स्थाक स्वराज संस्था मतदार संघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी दुपारी १२ पर्यंत २६२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला याची टक्केवारी २९.२७ इतकी होती. सकाळ सत्रामध्ये ८ ते १० या वेळेमध्ये केवळ २८ मतदारांनी आपला हक्क बजावला होता आता मतदान वेळ संपण्यासाठी काही तसाच शिल्लक असून एकूण ८९५ मतदारांपैकी २६२ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. आता पुढील काही तासात हा वेग वाढण्याचा अंदाज आहे. अत्यंत चोख पोलीस बंदोबस्तामध्ये हि निवडणूक मतदान प्रक्रिया सुरु असून आज डॉ मैनाक घोष हे या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेऊन आहेत. तर भाजप च्या नगरसेवकांनी आपली गोवा ट्रिप आज सकाळी थेट मतदान केंद्रावर वळवली आज सांगली येथील मतदान केंद्रावर माजी मंत्री आणि मिरज विधानसभेचे आमदार डॉ सुरेश खाडे, सांगली विधानसभेचे आमदार सुधीर गाडगीळ, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक प्रकाश ढंग भाजप नेते पृथ्वीराज पाटील, श्रीमती जयश्री पाटील, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी आमदार दिनकर तात्या पाटील माजी नगरसेवक आणि भाजप चे जेष्ठ नेते सुरेश बापू आवटीभारती दिगडे नीता केळकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सातारा येथील मतदान केंद्रावर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री ना छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी हजेरी लावली
*नगरसेविकेचा वाढदिवस आणि मतदानाचा हक्क*
आज मिरजेतील प्रभाग ४ च्या भाजप च्या नगरसेविका सौ अपर्णा विवेक (बंडू) शेटे यांचा त्या नगरसेविका झाल्यापासून पहिलाच वाढदिवस असून त्यांनी आज सकाळी प्रथम आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला त्यानंतर त्यांनी इतर सहकारी नगरसेवक मंडळींच्या शुभेच्छा स्वीकारल्या. आज वाढदिवसानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत दादा यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना दूरध्वनि वरून शुभेच्छा दिल्या




Leave a Reply