Advertisement

हिंदु जनजागृती समितीच्या आव्हानी शाखेच्या वतीने अर्धविसर्जित श्री गणेश मूर्तींचे पुन्हा विसर्जन.

प्रतिनिधी – किरण माळी

हिंदु जनजागृती समितीच्या आव्हानी शाखेच्या वतीने रविवार दिनांक 22 सप्टेंबर या दिवशी आव्हानी गावातील समितीच्या शाखेच्या माध्यमातून अभियान राबवले. यात शाखेतील धर्मप्रेमी बांधवांनी शेजारच्या भोकनी गावातील नदीत विसर्जित न झालेल्या गणेश मूर्तींना एकत्रित करून पुन्हा वाहत्या पाण्यात विसर्जित केले. यात पाण्यातून बाहेर आलेल्या श्री गणेश मूर्तींची विटंबना होत असल्याचे पाहून धर्मप्रेमी यांनी स्वयं प्रेरणेने हे अभियान राबवले.


यात सर्व धर्मप्रेमी संदीप पाटील, ज्ञानेश्र्वर पाटील, हर्षल पाटील, पाटील, ऋषिकेश पाटील, डीगांबर बाविस्कर, ओम पाटील, भावेश पाटील, हितेश पाटील, अभिषेक टोगलकर यांनी सहभाग घेतला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!