Advertisement

जय श्रीराम जय श्रीराम ने वैजापूर शहर दणाणले लाखो भाविकांची उपस्थिती.

जय श्रीराम जय श्रीराम ने वैजापूर शहर दणाणले लाखो भाविकांची उपस्थिती.

प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्यावर झालेल्या गुन्हा मागे घ्यावा व महाराजांच्या समर्थनार्थ आज वैजापूर येथे सकल हिंदू समाज व महंत गंगागिरीजी महाराज भक्त मंडळ यांच्या वतीने वैजापूर तहसील कार्यालयावर हुंकार मोर्चा काढण्यात आला होता अखंड हरिनाम सप्ताह मध्ये महंत रामगिरीजी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून चालू असलेल्या घडामोडी बांगलादेशात काय परिस्थिती आहे

बांगलादेशामध्ये हिंदू अजिबात सुरक्षित नाही तेथे स्त्रियांवरती अत्याचार करतात हिंदूंवरती अत्याचार करतात हीच का तेथील माणसांची दहशत मुळात त्या लोकांची मानसिकताच तशी आहे असे वक्तव्य महंत रामगिरीजी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले होते त्याच गोष्टीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रावर पडले ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली होती महाराजांवरती गुन्हाही दाखल करण्यात आले होते तो गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी वैजापूर तालुका सकल हिंदू समाज व गंगागिरीजी महाराज भक्त मंडळ यांच्या वतीने करण्यात आला होता हिंदू सूर्य महाराणा प्रताप चौक ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला होता मोर्चामध्ये भजनी मंडळ साधुसंत महिला सर्वांची उपस्थिती होती साधुसंतांनी आपापली प्रतिक्रिया व्यक्त केली उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं व पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!