वैजापूर तालुका शिष्टमंडळाने घेतली शरदचंद्र पवार साहेब यांची भेट
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
*संभाजीनगर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्र पवार साहेब यांचे वैजापूर तालुका अध्यक्ष मंजाहरी पाटील गाढे यांच्या शिष्टमंडळाने हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे भेट घेऊन वैजापूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला सोडावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली. वैजापूर तालुक्यात पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व राहिलेले आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत, नगरपालिकेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, खरेदी विक्री संघ, पक्षाची सत्ता राहिली व आदरणीय पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे . शेतकरी शेतमजुर कामगार या सर्वांना पवार साहेबा विषयी प्रेम आहे.वैजापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तालुक्यातील परिस्थिती बाबत सविस्तर चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणार मोठा वर्ग आहे. गेल्या काही दिवसात पक्षाने चांगले संघटन बांधणी केली. वैजापूर तालुक्यात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून बरीच लोक उपयोगी कामे झाली आहे.जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा वाटपात हा मतदारसंघ मिळाला तर विधानसभेत आपल्या पक्षाचा आमदार निवडून येणार यात शंका नाही अशा सर्व बाबी पवार साहेबांच्या निदर्शनास आणून तिकीटाची मागणी केली . आदरणीय पवार साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस वैजापूर तालुका अध्यक्ष श्री मंजाहरी पाटील गाढे, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश बापु ठुबे, विधानसभा अध्यक्ष श्री राजु भाऊ कराळे, सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष श्री रतन पगारे, सोशल मीडिया कार्याध्यक्ष श्री रावसाहेब सावंत,सरपंच श्री शरद बोरणारे, युवक कार्याध्यक्ष श्री विशाल मतसागर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अकबर भाई. युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष सरोवर. अल्पसंख्याक शहर अध्यक्ष जुबेर चाऊस,
यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.*


















Leave a Reply