22 वर्षानंतर बालपणीचे मित्र भेटले आनंद अश्रूंनी वाहिली वाट लहानपणच खूप सुंदर होते.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
22 वर्षानंतर वैजापूर तालुक्यात 2001-2002 या वर्षातील दहावीचे विद्यार्थी एकत्र आले ते स्वप्न स्मृती मेळाव्याच्या निमित्ताने , आठवणींच्या हिंदोळ्यावर झोका घेत हे विद्यार्थी दिवसभर एकमेकांच्या सहवासात रमून गेले, निमित्त होते जिल्हा परिषद प्रशाला मुलांची,शाळेमध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे,या मेळाव्यात डॉ.ईश्वरअग्रवाल,प्रमोद गायकवाड,निलेश रोठे,सचिन खोमणे,सचिन गायकवाड प्रवीण गाढे,प्रमोद सोनवणे,चंद्रभान घाटे,युनूस तांबोळी,योगेश साठे,जितेंद्र पवार ,गिरीश चापानेरकर,अकबर पठाण,भूषण पवार,विकास शिंदे,किशोर बसवेकर,संतोष शिंदे,चंद्रकांत भुजबळ,रणवीर राजपूत, यांच्यासह एकूण 147 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला काळ कितीही लोटला तरी मैत्रीचे ऋण बंध कमी होत नाहीत हेच सूत्र धरून वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या या माजी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विन पुन्हा घट्ट केली आठवणींचे सुवर्णक्षण उत्सव मैत्रीचा आणि सन्मान गुरुजनांचा या हेतूने एकत्र येऊन 22 वर्षांपूर्वीची आठवणीत हे विद्यार्थी रमले या विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.


















Leave a Reply