सत्यार्थ न्यूज रिपोर्टर :- किरण माळी
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर युवा ओबीसी कार्यकर्ते अॅड. मंगेश ससाणे यांचे गेल्या ९ दिवसांपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषण सुरू होते.आज राज्य शासनाच्या शिष्टमंडळासोबत या ठिकाणी अॅड. ससाणे यांची भेट घेतली.
यावेळी त्यांच्याशी चर्चा केली, तसेच ओबीसी आंदोलकांच्या मागण्यांना अनुसरून ओबीसी आरक्षणास धक्का न लावण्यासंदर्भात सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या आश्वासनांचे पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर शिष्टमंडळाच्या विनंतीला मान देत ॲड. मंगेश ससाणे यांनी आपले उपोषण मागे घेतले.
यावेळी मंत्रीमंडळातील सहकारी गिरीश महाजन, धनंजय मुंडे, उदय सामंत, आ. गोपीचंद पडळकर, माजी खासदार समीर भुजबळ, प्रकाश शेंडगे, शब्बीर अन्सारी यांच्यासह शिष्टमंडळातील सदस्य व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Girish Mahajan Dhananjay Munde Uday Samant – उदय रविंद्र सामंत Gopichand Padalkar – गोपीचंद पडळकर Sameer Bhujbal
#obcreservation #OBC #Reservation #ओबीसी

















Leave a Reply