भडगांव ब्रेकिंग ! शव रुग्णवाहिकेने रवाना……
भडगांव ब्रेकिंग : रशियामध्ये नदीपात्रात बुडुन जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या मयत विद्यार्थ्यांचे शव ताब्यात घेण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून उपविभागीय, अधिकारी, अमळनेर व उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांची नियुक्ती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली होती, मयत विद्यार्थ्यांचे शव हे विमानाने मुंबई विमानतळावर पोहचले होते. शासकीय कागदी पूर्तता पूर्ण करून रात्री 12 वाजेच्या सुमारास मयतांच्या नातेवाईक पालकांकडे शव उपविभागीय दोघेही अधिकारी यांतर्फे सुपूर्त करण्यात आले. तर भडगांव येथील मयत विद्यार्थी हर्षल अनंतराव देसले याचे शव मुंबईहून भडगावच्या दिशेने रवाना झाले असून पहाटे पर्यंत भडगाव येथे पोहोचेल. तर आज दिनांक 14 जून रोजी सकाळी 8 वाजता भडगाव येथील गुरुदत्त कॉलनी येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे, रशियामध्ये जळगाव जिल्हयातील शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या जिया फिरोज पिंजारी (वय २०) व जिशान अशफाक पिंजारी (वय २०, दोन्ही रा. अमळनेर) तसेच हर्षल अनंतराव देसले (वय १९, रा. भडगाव) हे तीनही विद्यार्थी ०४ जून रोजी वोल्खोव्ह नदीत बुडुन मृत्यू झाला होता. तीनही मयत विद्यार्थ्यांचे शव मुंबई विमानतळवरून शासकीय प्रक्रियेनुसार मयत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले. ही जबाबदारी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव आयुष प्रसाद यांनी महादेव खेडकर, उपविभागीय अधिकारी, अमळनेर भाग व भूषण अहिरे, उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांकडे दिली होती. दोघेही अधिकारी मुंबई येथील विमानतळावर हजर होते. कागदी पूर्तता पूर्ण करून घेत शव सोपविण्यासाठीची कार्यवाही त्यांकडून करण्यात आली.

















Leave a Reply