Advertisement

भडगांव : जवानाचा मृत्यू….

भडगांव : जवानाचा मृत्यू…..

सैन्यदलात गेल्या २३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या महिंदळेतील जवान संदीप पाटील यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ३० जुलै रोजी सेवानिवृत्त होणार होते. बुधवारी सकाळी १० वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संदीप पाटील हे श्रीनगर येथून देवळाली कॅम्प (नाशिक) येथे बटालियन सोबत रेल्वेने येत असताना झाशी रेल्वे स्टेशनवर सोमवार रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बुधवारी सकाळी १० वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर महिंदळे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जवान संदीप पाटील हे २००० साली सैन्यात भरती झाले. त्यांच्या ••• निधनाची बातमी कळताच गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. ते आर्मीत ३२९ बटालियनमध्ये अॅटलरी गनर म्हणून कार्यरत होते. ते श्रीनगर येथे आपली सेवा पूर्ण करून आपल्या बटालियनसह श्रीनगर ••• येथून निवृत्ती अगोदरच्या दोन महिन्यात देवळाली कॅम्प येथे सेवेत रेल्वेने निघाले होते. परंतु त्यांना झाशी रेल्वे स्थानकावर हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!