पाचोरा : दुचाकी व चारचाकी वाहनाची धडक..
पाचोरा : शहरातील जिओ बीपी पेट्रोल पंपा समोरील गाडगेबाबा नगर चौफुलीवर आज दिनांक 23 मे गुरुवार रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास दुचाकी Mh 19 BA 2651 Yamaha YBR व चारचाकी वाहनाची जोरदारधडक झाली. यातील दुचाकी स्वारास जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. दुचाकी वर एकटाच होता. तर पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन दुचाकीस धडकल्याने चारचाकी वाहनाचे पुढील पॅनल चे काही भाग दुचाकीत अडकले आहेत. या जोरदार धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ चारचाकी वाहन चालकानेच आपल्या वाहनात बसवून पुढील उपचारासाठी रुग्णालयाकडे घेऊन गेला आहे. दोघेही वाहन चालकांची ओळख अद्याप पटू शकली नाही. पाचोरा पोलिसांना घटनेस स्थळाची माहिती मिळताच त्यांनी घटनेस्थळावर धाव घेतली आहे. पुढील तपास व उपचार सुरू आहे