समस्त मिरजकर नागरिकांची अस्मिता असणारा आणि ऐतहासिक पार्श्वभूमी असणारा दर वर्षी हजारो गणेश मूर्तींचे विसर्जन होणारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारा श्री गणेश तलाव सध्या मद्यपिंचा अड्डा बनल आहे. सध्या मिरजेतील रोटरी क्लब आणि निसर्गप्रेमी नागरिकांकडून दर शनिवारी येथे स्वच्छता केली जाते मात्र ही स्वच्छता या मद्यपिंकडून बघवत नाही असे दिसून येतेय. या तलावाला खाली उतरत असताना पायऱ्यांवर विविध कंपन्यांच्या विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा तसेच पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडल्याचे दिसून येतेय. या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी स्वच्छता दररोज करतात मात्र हे मद्यपी बहादर यांना याचे काही सोयर सुतक नाही या मद्याच्या बाटल्या बरोबर इतर खाण्याच्या रिकाम्या पिशव्या अस्ताव्यस्त पडल्या आहेत. रात्री अंधाराचा फायदा घेऊन हे मद्यपी इथे आपला अड्डा बनवत असून वस्तीवरील पोलिसांनी तलावाच्या खालील बाजूस थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. किंवा येथील जागरूक नागरिकांनी या मद्यपिना येथे येण्यास मज्जाव केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना टळू शकेल काही महिन्यापूर्वी याच भागात एक सशस्त्र हल्ला झाला होता तसा भविष्यात घडू नये.
Leave a Reply