
महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडून सूर्यवंशी प्लॉट परिसराची पाहणी; ‘आपत्ती मित्र’ ॲप वापराचे आवाहन
घाटमाथ्यावर सुरु असलेल्या संततधार पावसाने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेता, सांगली महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून ‘पूरप्रवण’ भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आज महापौर धीरज सूर्यवंशी यांनी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सूर्यवंशी प्लॉट परिसरात पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. वाढती पाणी पातळी पाहता नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या पाहणी दौऱ्यात महापौरांसोबत अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त,मालमत्ता व्यवस्थापन, सहाय्यक आयुक्त (आपत्ती व्यवस्थापन ) सहाय्यक आयुक्त-क्षेत्रीय ,कार्यालय १ ,मुख्य अग्निशमन अधिकारी तसेच आरोग्य व अतिक्रमण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नदीपात्रातील वाढती पाणी पातळी आणि सखल भागातील परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या तसेच नागरिकांना खालील महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले,’पूरस्थितीची अद्ययावत माहिती आणि पाणी पातळीची माहिती मिळवण्यासाठी नागरिकांनी ‘आपत्ती मित्र’ हे ॲप डाऊनलोड करावे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहितीसाठी केवळ महानगरपालिका प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. पाणी पातळी वाढल्यास प्रशासनाच्या सूचनेनुसार विलंब न करता तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. महापालिकेने निवारा केंद्रे सज्ज ठेवली आहेत. पुराचे पाणी पाहण्यासाठी नदीकाठी किंवा पुलावर अनावश्यक गर्दी करू नये. आपल्या घरातील मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे आणि गरजेच्या वस्तू सुरक्षित व उंचावर ठेवाव्यात. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी आपत्ती व्यवस्थापन संबंधी माहिती देताना २४/७ आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन सुरु असल्याचे सांगितले महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र २४/७ सुरू असून, नागरिकांच्या मदतीसाठी खालील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा ७०६६०४०३३०, ७०६६०४०३३१, ७०६६०४०३३२,






Leave a Reply