Advertisement

राष्ट्रवादी च्या ओएसडींचा चा निरोप .. अन इद्रिस नायकवडी यांचा आमदारकीच्या राजीनामा देण्यास नकार… या सर्व बातम्या म्हणजे वावड्या असा कोणताही अधिकृत निरोप नाही; आमदार इद्रिस नायकवडी

प्रतिनिधी सुधीर गोखले

मिरजेतील इद्रिस नायकवडी याना राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या राज्यपाल कोट्यामधून देण्यात आलेली आमदारकी चा राजीनामा मागितल्याची जोरदार चर्चा आहे. पक्षाच्या युवावा नेतृत्वाने हा राजीनामा आमदार नायकवडी याना मागितल्याचे समजते. मात्र याआधी स्व अजित पवार असताना कधी माझ्याकडे राजीनाम्याची मागणी झाली नाही तर आता मी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी स्पष्ट केलंय. सुमारे १५ दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ओ एस डी यांनी राजीनामा देण्याबाबत आमदार इद्रिस नायकवडी याना निरोप दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यानंतर अलीकडेच एका युवा नेत्याने थेट आमदारकीच्या राजीनाम्याबाबत इद्रिस नायकवडी यांच्याकडे मागणी केली आहे. मात्र मी राजीनामा न देण्यावर ठाम असल्याचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी स्पष्ट केले. दरम्यान उद्या राष्ट्रवादी ची महत्वपूर्ण बैठक होत आहे या बैठकीमध्ये आमदारकीच्या राजीनाम्याबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.याबाबत आमच्या प्रतिनिधींनी आमदार इद्रिस नायकवडी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या बातम्या म्हणजे वावड्या उठवल्या जात आहेत असे सांगून या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला. ते पुढे म्हणाले मला अद्याप अधिकृत असा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून कोणताही निरोप नाही त्यामुळे या गोष्टीवर चर्चा करणे निरर्थक असल्याचे त्यांनी सांगितले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!