Advertisement

नसरापूर प्रकरण; उद्या ब्राह्मण समाजातर्फे सांगलीत दुचाकीवरून मूक मोर्चा; जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार निवेदन; नराधमास त्वरित फाशीची समाजाकडून मागणी

संवाद दाता सुधीर गोखले
काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साथ वर्षीय नराधमाने चार वर्षाच्या बालिकेवर लैगिक अत्याचारानंतर तिचा खून केल्याची घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. समाज माध्यमांवर या घटनेचे तिव्र पाडसांधी लागलीच उमटले सोशल मीडिया वर या नराधमास जितकी कठोर शिक्षा देता येईल तेव्हडी न्यायालयाने द्यावी अशी मागणीही जोर धरू लागली महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यातही या घटनेचे पडसाद उमटू लागले आहेत. काल सांगली येथील ब्राह्मण संघातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना या नराधमास त्वरित फाशी मिळणे बाबत निवेदनही दिले गेले आता उद्या म्हणजे ८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ब्राम्हण समाजातर्फे दुचाकी वरून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे त्याची सुरुवात सांगलीतील मारुती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होईल.दुपारी ४ वाजता सर्व ब्राह्मण समाजाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ एकत्र यावे तेथून या दुचाकी मूक मोर्चाला सुरुवात होईल असे आवाहन ब्राह्मण समाजातर्फ करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य अशी दुचाकी आणि चार चाकी शोभा यात्रा काढण्यात आली होती त्याच प्रमाणे आता या लहानग्या बालिकेसाठी तिला न्याय मिळण्यासाठी अशाच प्रकारे ब्राह्मण समाजाने दुचाकी मूक मोर्चाचे आयोजन केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!