प्रतिनिधी – गणेश धनगर.
आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी चोपडा विधानसभा मतदारसंघात आभार सभा घेतली.

चोपडा विधानसभा मतदारसंघात सतत दहा वर्षांपासून कोणत्याही जाती धर्माचे राजकारण न करता हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे च्या ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या विचारांवर विविध विकास कामे केली. माझ्या विरुध्द सर्व पक्षीयांनी एकच उमेदवार दिला होता परंतु माझ्या जिवाभावाच्या लोकांनी विश्र्वासावर मी निवडुन आलो असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आभार सभेत बोलताना सांगितले. हि सभा चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित करण्यात आली होती.

यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे पुढे बोलताना सांगितले की अडीच वर्षांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी लाडकी बहिण सारखे अनेक लोकप्रिय योजना आणल्या तसेच मतदारसंघासाठी भरघोस निधी दिला यासाठी पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन, आमदार अनिल पाटील, केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, अजित पवार गटाचे, तसेच आरपी आय गटाचे आभार आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी मानले. यावेळी माजी आमदार लताताई सोनवणे, जिल्हा बॅकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, सुभाष आण्णा साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील,

माजी उपसभापती एम व्ही पाटील,कृउबा संचालक रावसाहेब पाटील, गोपाल पाटील,शिवराज पाटील,विजय पाटील,किरण देवराज, कल्पना ताई पाटील,विंक्की सनेर, कविता ताई पाटील,हरिष पाटील, महेंद्र धनगर,सागर ओतारी, अरुण पाटील, विनोद पाटील, रविंद्र पाटील, प्रकाश दादा रजाळे,भरत चौधरी, कैलास बावीस्कर,नंदु गवळी, प्रदीप बारी, सचिन महाजन व सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.



















Leave a Reply