रिपोटर :- प्रभाकर सरोदे
पिंपळगाव हरेश्वर :- कै. आप्पासाहेब मोरेश्वर हरी देशपांडे यांच्या मृत्युपत्रानुसार मिळकतीच्या विक्रीतून आलेली रक्कम समाज उपयोगी
कै. आप्पासाहेब मोरेश्वर हरी देशपांडे यांच्या मृत्युपत्रानुसार मौजे पिंपळगाव बु ॥ ता. पाचोरा जि. जळगाव येथील मिळकतीच्या विक्रीतून आलेली रक्कम समाज उपयोगी पडावी या हेतूने अप्पासाहेबांनी सामाजिक शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना देणगी रूपाने आज दि .२०/१२/२०२४ शुक्रवार रोजी त्यांचे उत्तराधिकारी श्री .विजय शंकरराव देशपांडे व श्री नितीन रंगनाथ देव, पुणे यांचे हस्ते चेकचे वितरण श्रीस्वामी समर्थ केंद्र पिंपळगाव (हरेश्वर)-₹ ३,००,०००/-,माजी विद्यार्थी संघ संचलित मूकबधिर निवासी विद्यालय पिंपळगाव (हरे) – ₹ २,००,०००/-, श्री. विश्वासराव पवार, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, नगरदेवळा – ₹१,००,०००/-, इयत्ता ८ वी , ९वी, १०वी व १२वी मधील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती बक्षीस योजनेकरिता अध्यक्ष ,ग्रामविकास मंडळ ,पिंपळगाव (हरे) – ₹१,००,०००/-, श्री प्रमोद वामन सपकाळ,श्री सागर विजय देशपांडे,श्री अमोल अनिल पाटील,श्री मनोज मोहन पांडेजी यांना प्रत्येकी ₹ २०,०००/-तसेच महाराष्ट्रातील विविध संस्थांना देणगी दिलेली आहे. या प्रसंगी कार्यक्रमासाठी श्री. पी एस पाटील सर,श्री पी बी पाटील साहेब,श्री राजेंद्र विश्वनाथ महाजन, श्री नितीन रंगनाथ देव, श्री अभिजीत पाटील यांनी आप्पा साहेबांबद्दल व त्यांच्या दातृत्वदायी जीवनाबद्दल मनोगत व्यक्त करून सर्वांनी त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाबद्दल त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना विनम्र अभिवादन केले .याप्रसंगी श्री सुरेश बापू बडगुजर,श्री भास्कर धनजी पाटील,श्री सुखदेव विठ्ठल गिते,श्री प्रमोद मधुकरराव गरुड,श्री जनार्दन ओंकार देव,श्री देवेंद्र भिला देव,श्रीराम माधव चौधरी,श्री राजेंद्र आनंदराव सपकाळ,श्री मोहन जगन्नाथ पांडेजी ,मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ईश्वर पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते .याप्रसंगी दरवर्षी आप्पा साहेबांची पुण्यतिथी साजरी करावी. असा मनोदय सर्वांनी व्यक्त केला .या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मूकबधिर विद्यालयाचे उपशिक्षक श्री गोविंद महाजन यांनी केले.सदर कार्यक्रम मूक बधीर निवासी विद्यालयात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पारपाडण्यासाठी विद्यालयातील कर्मचार्यांनी सहकार्य केले.