पाचोरा परिसरात अवैध रिक्षा आणि वाहनांवर मोटर वाहन कायदा अंतर्गत कारवाई
पाचोराः शहरात अवैध रिक्षा चालक व रिक्षावर कारवाई व्हावी यासाठी पाचोरा एकता चालक- मालक युनीयनच्या वतीने मागील आठवड्यात आमरण उपोषणाचा पावित्रा घेत आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाला प्रतिसाद देत दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी पाचोरा शहर आणि परिसरात अवैध रिक्षा, विना परवानापरवाना, लायसन्स, आणि विविध गुन्हे असणाऱ्या वाहनांवर मोटर वाहन कायदा १९८८ अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत श्री. सौरभ पाटील (मोटर वाहन निरीक्षक), श्वेता पाटील (सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक), रंजित टिके (सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक) आणि मोहिन पिंजारी (वाहन चालक) यांनी सहभाग घेतला. प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी नागरिकांना अपील केले आहे की, वाहनाचे सर्व कागदपत्रे वैध ठेवावीत. यापुढेही अशीच कारवाई सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे, त्यामुळे वाहन चालकांनी व विशेषतः रिक्षा चालक – मालक यांनी नियमांचे पालन करावे. असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे