वैजापूर विधानसभा मतदार संघ वाणी साहेबांचा आहे त्यांच्या विचारांचाच आहे..……उद्धव बाळासाहेब ठाकरे.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
शिव संवाद यात्रेदरम्यान आज वैजापूर या ठिकाणी जिल्हा परिषद मैदानावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा घेण्यात आली होती हजारोंच्या संख्येने जनसमुदाय हजर होता वॉटरप्रूफ मंडप देखील व्यवस्था केलेली होती.
अनेकांनी केला शिवसेनेत प्रवेश . नांदूर मधमेश्वर कालव्याचे जनक माजी आमदार आर एम वाणी साहेब हेच होते वाणी साहेबांच्या विचारावरतीच खरा शिवसैनिक हा आपल्या भर सभेत बसलेला आहे त्यांच्याच शिवसैनिक
निवडून देखील येईल असे उद् गार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज वैजापूर येथील शिवसंवाद यात्रा दरम्यान वैजापूर येथे व्यक्त केला. यावेळी उपस्थित माजी खासदार संजय राऊत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे कन्नडचे आमदार उदय सिंग राजपूत महिला आघाडी .आनंदी ताई अन्नदाते लता ताई पगारे. उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे उपजिल्हाप्रमुख आसाराम पाटील रोठे शहर प्रमुख प्रकाश चव्हाण तालुकाप्रमुख बंडू वाणी उपजिल्हाप्रमुख संजय पाटील निकम. माझी सभापती मनाजी मिसाळ माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब मामा गलांडे. शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते